जामखेडमध्ये साकारण्यात आलयं राजमाता जिजाऊ यांचे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र….

अहमदनगर : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य रेखाचित्र तयार करण्यात आलंय. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून नागेश विद्यालयाच्या मैदानावर १५ हजार स्क्वेअर फूटवर राजमाता जिजाऊ यांचे जगातील सर्वात मोठे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.

१२ जानेवारी रोजी जिजाऊ माँ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. त्यांना अनोखी आदरांजली देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. ज्याची नोंद जागतिक पातळीवरील विक्रमांमध्येही केली जात आहे. माँ साहेबांचे चित्र साकारण्यासाठी किल्ले बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेसॉल्ट खडकाच्या दगडाचा वापर करण्यात आला असून पांढरा व काळ्या चुन्याचा रंगवण्यासाठी वापर केलेला आहे.

🤙 8080365706