छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये बॉम्ब…

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.

बॉम्बचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक, पोलीस, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु रेल्वे स्टेशनवर बॉम्ब आहे हे मॉक ड्रिल असल्याचे समजतात सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडल्याची माहिती समोर येत आहे.

परंतु बॉम्बचा तपास करण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशन मोकळे करण्यात आले. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस फोर्स फाटा रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. मॉक ड्रिल असल्याचे समजतात सर्वांनी सुटकेचा निष्कर सोडला.