उद्या राजगडावर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा 425 वा ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा…

कोल्हापूर : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी(दि. 12) राजगडाच्या मावळा तीर्थावर मानवंदना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा, कष्टकर्‍यांचा गौरव करण्यात येणार आहे. राजगडाच्या पायथ्याशी पाल येथील मावळा तीर्थावर मावळा जवान संघटना व मावळा परिवाराच्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे.कर्नल सुरेश पाटील, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल, तहसीलदार शिवाजीराव शिंदे , राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकरआदी उपस्थित राहणार आहेत. यंदाचा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवरील राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार स्वाती पाचुंदकर, बारामती येथील लेखिका अर्चना सातव यांना देण्यात येणार आहे.