प्रहार संघटनेचे नेते, मा. मंत्री बच्चू कडू यांचा अपघात

अमरावती : राज्यातील अपघातांच्या मालिकांमध्ये आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या नंतर प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. यात ते सुखरूप असल्याचं कळतंय.

अमरावतीत आज (11 जाने.) सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू हे रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने बच्चू कडू यांना जोरदार धडक दिली असता त्यांना डोक्याला, हाताला, पायाला मार लागला आहे.

बच्चू कडू यांना अमरावतीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला 4 टाके पडले असल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे.आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये”, असं ते म्हणाले.