मोठी बातमी ! आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

कोल्हापूर :कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज सकाळी सहा वाजता ईडीने छापेमारी केली आहे.

सकाळी पोलिसांनी अचानक ही छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निवासस्थानाबरोबरच त्यांच्या कोल्हापूर व पुण्यातील 2 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी काही दिवसापूर्वीच तक्रार केली होती त्यामधून ही कारवाई झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या शंभर कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी ही ईडीची कारवाई झाली असल्याचेही बोलले जाते.आमदार मुश्रीफ यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी या छापेमारी बाबत अधिकृत माहिती घेऊनच बोलू असे सांगीतले .