कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात धक्कादायक निकालाची नोंद…

कोल्हापुर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे.

कागल तालुक्यात मुश्रीफांना मोठ्या गावांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांनी 12 पैकी 10 गावांमध्ये विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला ग्रामपंचायती गेल्या आहेत. चंदगड तालुक्यातील शिनोळीत मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. मात्र, त्या ठिकाणी शिंदे गटाचा पराभव झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायती आणि 413 सरपंचपदासाठी आज 12 तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. कागल तालुक्यात मुश्रीफांना मोठ्या गावांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला गड राखला आहे. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे, चरण, साळशी, खुटाळवाडी, वरेवाडी, वारणा कापशी, हरुळेवाडी, भेडसगाव, कोतोली, रेठरे, विरळे, खेडे, या गावांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे. गोगवे, पिशवी, शिवारे गावांमध्ये जनसुराज्य-काँग्रेस आघाडीकडे सत्ता गेली आहे.

राधानगरी तालुक्यातील विजयी सरपंचअकनुर – सुषमा गणेश कांबळेमल्लेवाडी – दिनकर दत्तात्रय खाडेकरंजफेण – जयश्री संतोष वागरेहसणे – पूजा शरद पाटील कारिवडे – प्रवीण मधुकर पाटील सुळंबी – सुरेखा प्रदीप गुरवपिंपळवाडी – महादेव बापू जाधव घोडेवाडी – मनीषा संभाजी किरोळकर मुसळवाडी – आशा सुनील महाडिक मांगोली – नेताजी कुंडलिक पाटीलकांबळवाडी – अनिता सुरेश कुसाळे कासारपुतळे – सुनीता शंकर पवारतळगाव – कृष्णा ज्ञानू पाटील मजरे कासारवाडा – योगिता युवराज वागरेकपिलेश्वर – शहाजी बाजीराव पाटीलशिरसे – निकिता प्रवीण कांबळे तारळी खुर्द – सरिता युवराज पौंडकरगडहिंग्लज तालुक्यातील सरपंचपदाचे विजयी उमेदवार जखेवाडी -वैशाली गिरीतारेवाडी – विश्रांती नाईक शिरपूर तर्फ नेसरी -सचिन गुरवयमहट्टी – संगीता नामदेव धुमाळेडोनेवाडी – सिकंदर मुल्ला हडलगे – हणमंत पाटील काळामवाडी – सरिता लांडे वैरागवाडी – पी. के. पाटीलबिद्रेवाडी – दत्तात्रय गुरव नंद्याळ – मनीषा सुरेश कांबळेफराकटेवाडी – शीतल फराकटे दौलतवाडी – शीतल जाधव चंदगड तालुक्यातील शिनोळीत शिंदे गटाचा पराभवदरम्यान, चंदगड तालुक्यातील शिनोळीत राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवली आहे. एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी सत्ता मिळवली. शिनोळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रचार केला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या. शिनोळी गाव बेळगावला लागून आहे.

🤙 8080365706