धामणी नदीवरील बंधारा फुटला ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने केलेल्या मनमानी उपसा बंदीमुळे धामणी नदीवरील बळपवाडी पन्हाळा) गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी ) या दरम्यान असणारा मातीचा बंधारा आज सकाळच्या सुमारास फुटला. बंधारा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

धामणी खोऱ्यात धामणी धरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्याकडून ठिकठिकाणी मातीचे बंधारे घातले जातात. अंबर्डे (ता. पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी यावर्षी त्यात उशिराने पाणीसाठा केल्यामुळे हा बंधारा रिकामा राहिला होता.

त्यामुळे पाटबंधारे विभागाने एकतर्फी निर्णय घेत गत आठवड्यात उपसा बंदी जाहीर केली होती. या उपसा बंदीच्या निर्णयामुळे या परिसरात तीव्र असंतोष पसरला होता.उपसा बंदीमुळे वरील धरणातील पाणी गवशी पाटील वाडी -बळपवाडी बंधाऱ्यात येऊन साठले होते. अंबर्डे बंधारा रिकामा असल्यामुळे या मातीच्या बंधार्‍यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा बंधारा मध्येच फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

🤙 8080365706