
मुंबई : महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्ष आणि घटकांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या विषयी सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सीमावादावरुन भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य हे हिंदुस्तान-पाकिस्तान आहेत का?”, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.“महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष आणि वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित आहेत. 5 डिसेंबरला इथे पत्रकार परिषद झाली होती. 7 डिसेंबरला महामोर्चाबद्दल चर्चा करण्याचं ठरलं होतं. त्यानुसार चर्चा झाली”, असं अजित पवारांनी सांगितलं.“आजच्या बैठकीचा हेतू अजित पवारांनी सांगितला आहे. परवाची बैठक ही धावपळीची झाली आणि आम्ही मोजकेच लोकं उपस्थित होतो. आज मात्र महाविकास आघाडीचे सर्व घटक, मित्रपक्ष उपस्थित आहेत. 17 डिसेंबरला महाराद्रोहींविरोधात हल्लाबोल करण्यासाठी प्रचंड, अतिविराट मोर्चा निघणार आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
