
कोल्हापूर : येत्या १४ डिसेंबरला अमित शहा हे यासंदर्भात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून लवकर सीमावादावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर आपला दावा सांगितल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासण्यात आलं.दरम्यान, या वादावर केंद्राने लवकरात लवकर तोडगा काढवा अशी मागणी, राज्यातील नेत्यांकडून केली जात आहे. आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद लवकरच सोडवू असं आश्वासन महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलं आहे.
