हिल स्टेशनकडे गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी..

कोल्हापूर: हिल स्टेशन असलेल्या भागात म्हणजेच लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, चिखलदरा या भागात तर कडाडून थंडी पडताना दिसत आहे. तरी गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

यावर्षी राज्यभरात जोरदार पाऊस पडला असल्याने कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नाशिक , नागपूर , पुणे , सातारा , हिंगोली या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. महाबळेश्वरात तापमान 8 अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. तर नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण बघायला मिळत आहे.सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. तर शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तरी राज्यभरातील नागरिकांनी हुडहुडी भरली आहे.

🤙 8080365706