म्हारुळ येथे दलित वस्ती सभागृह बांधकामाचे उद्घाटन

बहिरेश्वर प्रतिनिधी : म्हारुळ ता.करवीर येथील दलित वस्ती येथे बांधण्यात येणाऱ्या हॉलचे उद्घाटन करण्यात आले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांचे हस्ते हे  उद्घाटन करण्यात आले.

आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातुन या हॉल करिता १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बोलताना बाळासाहेब खाडे म्हणाले की, या सभागृहाचा वापर दलित बांधवांनी राजकीय गट-तट न मानता सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता तसेच सर्व समाजासाठी करावा असे आवाहन केले. आमदार पी.एन.पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल उपसरपंच सरदार पाटील यांनी आभार मानले.

यावेळी सरपंच रुपाली चौगले, माजी सरपंच वंदना म्हाकवेकर, माजी उपसरपंच सागर चौगले, सदस्य राजाराम कुंभार,सौ अलका पाटील,सौ रेखा कुंभार,श्री प्रकाश कांबळे, श्रीमती शालाबाई गुरव तसेच प्रतिष्ठीत नागरिक सिंग्राप्पा पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील,शंकर मगदुम, पंडित मडके, रविंद्र पाटील,अशोक पाटील,डी वाय मगदुम,भैरु पाटील,शिवाजी पाटील,अमृता मडके,आण्णा चौगले, हिंदुराव चौगले, कृष्णात चौगले,दिपक पाटील,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक पांडुरंग मेंगाणे यांनी केले, प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील यांनी केले