गगनबावडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

गगनबावडा : गगनबावडा पंचायत समितीच्या एकूण चार गणासाठी आरक्षण सोडत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नियंत्रण अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.

आरक्षण पुढीलप्रमाणे:

तिसंगी-अनुसूचित जाती

असंडोली-सर्वसाधारण

असळज-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

धुंदवडे- सर्वसाधारण स्त्री

असंडोली व धुंदवडे मतदार संघाचे आरक्षण सत्यजित नागावकर या अकरा वर्षाच्या मुलाच्या हस्ते चिट्ठी काढून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील. माजी उपसभापती पांडुरंग भोसले,सुरेश पाटील, उत्तम बांडागळे. सामाजिक कार्यकर्ते एस. के. पाटील, राणोजी सुतार , आमित नागवकर उपस्थित होते.

🤙 8080365706