ऑगस्टमध्ये बँका १३ दिवस बंद

मुंबई : दि. १ ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी निश्चित केल्या जाणार आहेत. तसेच रोख व्यवहारांसंबंधित नियमही बदलणार आहेत. ऑगस्टमध्ये अनेक सण साजरे होणार असल्याने तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या.

याशिवाय बँक ऑफ बडोदा चेकशी संबंधित नियम १ ऑगस्टपासून बदलणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पॉजिटिव पे सिस्टम जारी करण्यात येणार आहे.

बँका १३ दिवस राहणार बंद

ऑगस्टमध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बँक बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत, ज्या दिवशी बँकांना सुट्टी असेल. याशिवाय रविवारी दुसरा आणि चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी असल्याने बँका बंद राहणार आहेत. या साप्ताहिक सुट्या धरून ऑगस्टमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.

🤙 8080365706