राज्याच्या सत्तासंघर्षात ‘यांना’ सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; पुढील सुनावणी ११ जुलैला

नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला १२ जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या अपात्रेतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आता मुदतवाढ दिल्याने एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गट आणि विधानसभा उपाध्यक्ष, शिवसेनेच्या वकिलांमध्ये मोठा युक्तिवाद झाला. या युक्तिवादाच्या दरम्यान काही खटल्यांचा दाखला देण्यात आला आहे.

🤙 9921334545