कोल्हापूर (प्रतिनिधी) : धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या निवडणुकीत आमच्या धन्वंतरी स्वाभिमानी समविचारी पॅनेलने संस्था आणि सभासदांच्या विकासाचा वचननामा जाहीर केला आहे. या निवडणुकीमध्ये आमचे पॅनेल मोठ्या मताधिक्याने सभासद निवडून देतील यात कोणतीच शंका नाही असा विश्वास पॅनल प्रमुख सुभाष इंदुलकर यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला.
यावेळी बोलताना इंदुलकर म्हणाले, आमच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी थेट मतदारांपर्यंत पोहचुन पॅनलची भूमिका आणि ध्येय धोरणे स्पष्ट केली आहेत. को को कोणत्याही परिस्थितीत आमचे पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या शिवाय राहणार नाही. वचन नाम्यातील काही ठळक मुद्दे मांडताना इंदुलकर म्हणाले, भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ पारदर्शी कारभार व कार्यक्षम प्रशासन आणि सभासदांना आपुलकीची सेवा देण्याचे आमचे धोरण आहे.त्याचबरोबर कर्ज मर्यादा वाढवणे आणि सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, नियमित व वेळेत कर्जफेड करणाऱ्या सभासदांना रिपीट सवलत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संचालक मंडळाच्या दरमहा दोन सभा आयोजित असून एकच सभा घेणे, त्याचबरोबर त्यावरील नाहक खर्च कपात करून काटकसरीचे धोरण अवलंबून आहोत.
सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांसाठी सन्मान योजना, दीपावली भेट मागील वर्षासह आकर्षक स्वरूपात देण्याचा मानस , एन.पी.ए. कमीत कमी ठेवण्याकडे अधिक लक्ष, जास्तीत जास्त ठेवी तसेच सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी साठी व्याजदरात वाढ करण्याचा प्रयत्न, सभासदांच्या पाल्याकरिता विविध योजना, सभासद कुटुंबियांची स्पेशल डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, जिल्ह्या बाहेर कर्ज घेऊन गेलेल्या कर्जदार सभासदांकडून कर्ज वसुली करता विशेष मोहीम राबवण्यात येऊन संस्थेचा नफा वाढविण्याकडे लक्ष, सभासदांच्या शुभकार्य सप्रेम भेट योजना लागू करणार, कर्जदार सभासद व ठेवीदार यांच्याकरिता विमा योजना, इच्छुक असलेल्या आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना सुलभ पद्धतीने सभासद करून घेण्यास प्राधान्य, मयत सभासदांच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी तात्काळ दहा हजार रुपयांची मदत देणारा असा वचननामा संस्था व सभासदांच्या हिताचा असल्याचे केंद्रप्रमुख इंदुलकर यांनी सांगितले.
सभासदांनी परिवर्तन करण्याचे ठरवले असल्याने धन्वंतरी स्वाभिमानी समविचारी पॅनल कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे त्यांनी खात्री पूर्ण सांगितले.