उंचगाव : उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत १५ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३७० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली.
संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पेन्शन दिली जाते. बँकेमध्ये जाण्यासाठी थेटबससेवा नसल्याने एक तर पायी चालत जावे लागते किंवा रिक्षा मधून जाण्यासाठी रिक्षावाला प्रत्येकी १०० ते २०० रुपये घेतो. तसेच बँकेच्या दारामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने तो पेन्शनधारक सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेला की संध्याकाळी ४ ते ५ वाजताच घरी येतो.
पेन्शनधारकांची परवड होऊ नये व’बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्यावतीने व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगावातील पेन्शन धारकांना मंगेश्वर मंदिर या ठिकाणी विशेष शिबीर घेऊन पेन्शनचे वाटप करण्यात आले.यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, विभागप्रमुख दीपक रेडेकर, माजी उपतालुकप्रमुख विक्रम चौगुले, अजित चव्हाण, योगेश लोहार, केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर, मिलींद प्रभावळकर, विजया माने आदी उपस्थित होते.