‘घाडगे-पाटील’चा कामगार ते सरपंच ते डॉक्टरेट… जितेंद्र यशवंत यांचा संस्मरणीय प्रवास !

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील घाडगे-पाटील कंपनीचा कामगार ते सरपंच व सरपंच ते डॉक्टरेट असा थक्क करणारा संस्मरणीय प्रवास जितेंद्र तानाजी यशवंत यांनी केला आहे.

कोणाचे आयुष्य कधी कोठे आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. पण आपला मार्ग प्रामाणिक विश्वासाचा व जिद्दीचा असलेस कोणतेही यश आपण नक्कीच मिळू शकतो, हे डॉ. जितेंद्र तानाजी यशवंत यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

डॉ. जितेंद्र तानाजी यशवंत यांनी त्यांना नुकतेच साउथ इंडियन मधील इंडियन युनिव्हर्सिटी कडून बिझनेस आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट ही पदवी मिळली आहे. अत्यंत कमी वयात मानाची डॉक्टरेट मिळवून डॉ.जितेंद्र यशवंत यांनी आपल्या कार्याचा समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले जितेंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वसा अंगी वारसा घेऊन वडील एसबीआयमधून निवृत्त व कामगार संघटनेचे नेते तानाजी यशवंत व आई नंदा यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शक असून त्यांचा खडतर प्रवास सुखकर होत गेला. घाडगे-पाटील कंपनीमध्ये काही वर्षे काम करत होते. म्हणूनही त्यांनी काम केले. पण सामाजिक कार्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यातूनच त्यांनी गडमुडशिंगी-हुपरी रो हाऊसेस बांधायचे ठरविले. व स्वस्तात पण दिमाखदार बंगले बांधून देण्यात ते काम करू लागले. व काही वर्षातच त्यांनी या बांधकाम व्यवसायामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. यातूनच त्यांनी सामाजिक कार्यासाठी ते तन-मन व धन याची मदत करू लागले.

त्यातूनच त्यांनी पहिल्यांदाच समाजकार्याच्या जोरावर ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली व जिंकलीही. सरपंच होऊन त्यांनी काही वेळात आदर्श यशवंत सरपंच घेण्याचा मान मिळविला. त्याचबरोबर महापूर व कोरोना काळात केलेली सेवा ही त्यांना डॉक्टरेटपर्यंत घेऊन गेली. हा प्रवास जरी सोपा वाटत असला, तरी खडतर होता. त्यांना अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कोरोना योद्धा, व युवा उद्योजक, समाज भूषण,आदर्श सरपंच यशवंत असे अनेक पुरस्कार हे त्यांच्या समाज कार्यातून मिळाले आहेत. त्यातूनच त्यांना मार्ग हा कोल्हापूरपासून साउथ इंडियापर्यंत पोचवला व त्यांना डॉक्टरेट मिळवून देऊन गेला.

ज्या समाजात आपण जन्मलो त्यांचे आपण काही तरी देणे लागतो. या जाणिवेतून कार्य करीत असलेले जितेंद्र हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात व नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात. अशा या युवा नेतृत्वाला डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. गडमुडशिंगी गावची नोंद साऊथ इंडियामध्ये घेतली असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.