लखनौ : योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. लखनौतील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडीयमवर झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री म्हणून केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी शपथ घेतली. भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण ५२ मंत्र्यांनी शपथ घेतली.