गारगोटी (प्रतिनिधी) : ज्यांच्या पिढ्यानपिढ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या उध्दारासाठी खपत आहेत. त्यांच्यावर बदनामीचे शिंतोडे उडवले जात आहेत. सत्यजीत जाधव यांची नाहक बदनामी कदापी सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे यांनी दिली.
घोरपडे पुढे म्हणाले, एका सरकार घराण्यातील जेष्ठ सुपुत्र की ज्याला सामाजिक राजकिय जीवनाची चांगली जाण आहे. तळागाळातील सर्व निवडणुका ते जनतेचा विश्वास संपादन करत, जनतेच्या हितासाठी कार्यरत असतात.राधानगरी विधानसभा मतदार संघातील जनतेला आणि बिद्री साखर कारखान्याच्या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने न्याय देत या घरण्याने आपले कर्तृत्व सिध्द केले आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून समाजाची अविरत सेवा केली ते हे घराणे. कॉंग्रेस पक्षाशी कायमपणे एकनिष्ठ आहे हे सांगायला जोतिष्य ची गरज नाही. किरकोळ कारणावरून वादावादी होत असतात. याचे असे अवडंबर माजवणे म्हणजे आमच्या कॉंग्रेस पक्षाची बदनामी आहे. यासाठी आंम्ही सर्व कॉंग्रेसजन सत्यजीत जाधवांच्या पाठीशी खंबिरपणे उभे आहोत.