जिनिव्हा : जगाला ग्रासून टाकणारी कोरोना साथ यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डाॅ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सर्वांना दिला आहे. विकसित देशांनी आपल्याकडील लसींचा गरीब देशांना पुरवठा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना साथीचे हे आता तिसरे वर्ष आहे. घेब्रिसस म्हणाले की, यंदाच्या वर्षी कोरोना साथ संपुष्टात येणार असली तरी त्यामध्ये विकसित देशांनी गरीब देशांना कोरोना प्रतिबंधक लसी न पुरविल्यास काही अडथळे येऊ शकतात. जगात कोरोना लसींचे समप्रमाणात वाटप न झाल्यामुळेच ओमायक्रॉनसारखा नवा विषाणू निर्माण झाला. लसींच्या वाटपात असमानता असेल तर विषाणूंचे अधिकाधिक प्रकार निर्माण होण्याचा धोका आणखी वाढतो.