मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांचे फोटो ‘बुल्ली बाई’ नावाच्या सोशल मिडियावर शेअर केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेत. याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असताना, आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, मुंबई सायबर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा आणि सीआयडी, मुंबई हे GitHub वर होस्ट केलेल्या अॅप डेव्हलपरच्या विरोधातील सायबर गुन्ह्याचा तपास करत आहेत.कलम 153(A), 153(B), 295(A), 354D, 509, 500 IPC r/w 67 IT कायदा अंतर्गत ट्विटर हँडल धारक आणि बुल्लीबाई अॅप डेव्हलपर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस कठोर कारवाई करतील, असेही वळसे-पाटील म्हणाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे बेकायदेशीरपणे डाउनलोड केली आहेत आणि त्यांचे फोटो ऑनलाइन लिलावासाठी ‘बुल्ली बाई’ अॅपवर अपलोड केली आह‘Bulli Bai’ अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना केले टार्गेट; पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय व्यक्तींचे फोटो सोशल मिडियावर शेअर करण्या आधी साधारण 6 महिन्यांपूर्वी ‘सुल्ली डील्स’ द्वारे मुस्लिम महिलांच्या फोटोंच्या लिलावाची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर आता असेच दुसरे ॲप ‘बुल्ली बाई’ नावाने व्यासपीठावर आले आहे. याठिकाणी महिला पत्रकारांसह 100 हून अधिक प्रभावशाली मुस्लिम महिलांच्या फोटोचा ‘लिलाव’ करण्यात आला होता. या संदर्भात Twitter आणि Github या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ईमेल पाठवले आहेत. त्यांच्याकडून उत्तरे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.