गोकुळ दूध संघ निवडणूक रखडली! 5 मोठ्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची निवडणूक वेळेत न घेतल्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासकीय निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त आणि दुग्ध विभागातील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

 

मा. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2026 रोजी गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश दिले होते. परंतु आजपर्यंत निवडणूक कार्यक्रमालाही सुरुवात झालेली नाही.

 

यामुळे करवीर तालुक्यातील हासुर येथील कै. राऊ सखाराम पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

अनिल कवडे- आयुक्त, शासकीय निवडणूक प्राधिकरण

अशोक गाडे- सचिव, शासकीय निवडणूक प्राधिकरण

राजकुमार पाटील – तत्कालीन उपनिबंधक, सहकारी संस्था दुग्ध, पुणे

देविदास मिसाळ- सध्याचे उपनिबंधक, सहकारी संस्था दुग्ध, पुणे

. कृष्णात ठाकरे- सहनिबंधक, दुग्ध, कोल्हापूर यांच्यावर याचिका दाखल करण्यात आलीआहे.

 

संस्थेचा आरोप आहे की या अधिकाऱ्यांनी संगनमताने जाणूनबुजून निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

29 जुलै 2026 रोजी कोल्हापूर सर्किट बेंचनेही पुंगाव येथील श्री स्वामी समर्थ दूध संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना “निवडणूक तात्काळ घ्या, अन्यथा कारवाई होईल” असे आदेश दिले होते.

 

त्यास अनुसरून प्राधिकरणाचे सचिव श्री. गाडे यांनी उपनिबंधक श्री. मिसाळ यांना प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न केल्याने खुलासा मागितला होता. पण आजपर्यंत कोणतीही यादी प्रसिद्ध झाली नाही.

 

या अवमान याचिकेवर *सोमवार, 10 ऑगस्ट 2026* रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच शासनाने मागितलेल्या मुदतवाढीच्या अर्जावरही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे.

 

आता न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

🤙 8080365706