कोल्हापूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. सन 2026-27 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या उदिदष्ट व तरतूदीच्या अधिन इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जूनपर्यंत सादर करावेत.

अर्जासोबत द्यावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरूष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे नोंदणी झाल्याबाबतचे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र. स्वयंसहाय्यता बचत गटातील ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे दाखले असणे आवश्यक आहे. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतीलच असावेत. बचत गटातील सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र. (तहसिलदार यांचे) बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड असावे.
स्वयंसहाय्यता बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे संयुक्त असावे व ते आधार क्रमांकाशी संलग्न असावे. स्वयं सहाय्यता बचत गटाचे ताळेबंद प्रमाणपत्र असावे. बचत गटातील सभासदाचे रेशन कार्ड (एकाच कुटुंबातील एकच सभासद असावा). उपलब्ध तरतूदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रूपये ३.५० लाख राहोल. त्यामध्ये ९० टक्के म्हणजेच रूपये ३.१५ लक्ष (तीन लाख पंधरा हजार रूपये फक्त) शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा १० टक्के म्हणजेच रूपये ३५,०००/- इतका असेल.
अर्ज कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार निवडीसाठी केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले.
00000
