सुवर्णा पाटील व सुयशा घाटगे यांना विजयी करून गणपतराव पाटील यांचा समाजवादी विचार जपूयाराजे समरजितसिंह घाटगे

सिद्धनेर्ली:स्व,गणपतराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या स्नूषा सुवर्णा पाटील यांना सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या सोबत जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सुयशा घाटगे यांनाही विजयी करून गणपतराव पाटील यांचा समाजवादी विचारांचा वसा पुढे नेऊया, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

ते सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सुयशा घाटगे व पंचायत समितीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांच्या प्रचारार्थ सिद्धनेर्ली व शेंडूर येथे आयोजित बैठकीत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करून युतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम, सरपंच दत्तात्रय पाटील, शंकरराव मेथे, तुकाराम शिंदे, अजित डोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी सरपंच एम. बी. पाटील, वाय. व्ही. पाटील, विलास पवार, कृष्णात मेटील, शाहू कृषी संघाचे अध्यक्ष रामचंद्र वैराट, राघू हजारे, हिंदुराव मगदूम, गुणाजीराव निंबाळकर, मधुकर भांडवले, मधुकर मेथे, सरपंच अमर कांबळे, संदीप लाटकर, महादेवराव निंबाळकर, गजानन पाटील, आनंदा पाटील, ज्ञानदेव पाटील, निलेश पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706