ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि स्वावलंबन जपणे हीच आपली खरी जबाबदारी : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर:ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि स्वावलंबन जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. याच भावनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी गारगोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रमा’स पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहिले.

तज्ञ डॉक्टरांकडून तालुक्यातील ९०० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून घेतल्यानंतर, २२१ ज्येष्ठ नागरिकांना चालण्याची काठी, कुबडी, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, कमोड खुर्ची, कमोड व्हील खुर्ची, व्हीलचेअर, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा अशा सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित हास्य आणि समाधानाची भावना हेच या उपक्रमाचे खरे फलित ठरले.

तसेच या ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरण वाटपासंदर्भात विशेष प्रयत्न केल्याबद्दल डॉ. श्रुषा कांबळे, डॉ. मयुरी चौगुले, राहुल मोरे यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार देखील करण्यात आला.

‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या विचाराने प्रेरित होऊन, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न निरंतर सुरू राहील, अशी भावना याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती  बाबा नांदेकर, बाजार समितीचे माजी संचालक  कल्याणराव निकम, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष  विक्रम पाटील, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर,  अवधूत परुळेकर,  शरद मोरे,  युवराज सुर्वे यांसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

🤙 8080365706