कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन’ करण्यात आले.
यामध्ये ,
केंद्र शासन पुरस्कृत UIDSSMT योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागाकरिता भुयार गटार योजना राबवणे व 18 द.ल.ली क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राची उभारणी – निधी ₹130.60 कोटी
नगरोत्थान अभियान अंतर्गत इचलकरंजी शहर भुयार गटार योजनेचे बळकटीकरण आणि वाढीव भागामध्ये भुयार गटार योजना विकसित करणे – निधी ₹488.67 कोटी
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत इचरकरंजी शहर पाणीपुरवठा योजना: शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या 6 उंच टाक्या उभारणे व पंपिंग मशीन तसेच दाब-नलीका टाकणे व संबंधित कामे करणे – निधी ₹31.37
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन – निधी ₹59 कोटी
नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे उदघाटन – निधी ₹4 कोटी
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी मंजुरी पत्रांचे वाटप – लाभार्थी संख्या 4200
बांधकाम कामगार (कामगार विभाग) भांडे व इतर साहित्य वाटप – लाभार्थी संख्या 5000
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे मंजूर करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजचे उदघाटन