कोल्हापूर प्रतिनिधी (किशोर जासूद)
मराठा महासंघतर्फे महिलासाठी मोफत लेझीम प्रशिक्षण शुभारंभ शानदार पद्धतीने झाला. महालक्ष्मी धर्मशाळा व अन्नछत्राचे राजू मेवेकरी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ हर्षदा तसेच कोल्हापूरचे प्रसिध्द हलगीवादक बापू आवळे व त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या व मर्दानी वस्ताद बाबासाहेब लबेकर मार्गदर्शनाखाली लेझीम प्रशिक्षण शुभारंभ झाला.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी लेझीम शिबिर घेण्याचा उद्देश स्पष्ट करून ६ जून राज्याभिषेक मिरवणुकीमध्ये महिलांचे पथक पूर्ण तयारीनिशी तयार होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संजय आवळे धनाजी दाभाडे प्रकाश पाटील भार्गव आवळे मोहन सुर्वे उपस्थित होते
प्रस्ताविक जिल्हा महिला अध्यक्ष शैलजा भोसले यांनी केले तसेच या लेजिम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मराठा महासंघ महिला आघाडीच्या वतीने मेघा मुळीक, संपत्ती पाटील, संयोगिता देसाई, पूजा पाटील, भावना आवळे, वैजयंती साळोखे, पूनम जाधव, सरिता घोरपडे यांनी केले. यावेळी मनीषा सुतार, शैलजा कळेकर यांच्या सह महिला व मुली उपस्थित होत्या हे शिबीर 4 जून पर्यंत चालू राहणार असून महिला व मुलींनी लेजिम प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ही करण्यात आले आहे