कोल्हापूर : भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांना नियुक्त पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले.
भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विशेष बळ मिळावे यासाठी शासन नियमाच्या अधीन राहून विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामधून पन्हाळा तालुक्यात एकूण ७२ कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या सर्वांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अडचण असल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा, आगामी होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजुटीने काम करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी महायुतीची सत्ता आणूया असे आवाहन यावेळी केले.
यावेळी के. एस.अण्णा चौगुले, राजवर्धन नाईक निंबाळकर, बाबुराव परितकर, . डॉ. अजय चौगुले, डॉ. स्वाती पाटील, अमरसिंह भोसले, मंदार परितकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.