10 वीचा निकाल उद्या होणार जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. आता दहावीच्या परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळं विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर उद्या 10 वीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सर्व साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

🤙 8080365706