भगवान महावीर अध्यासनाला एक लाखाचे अक्षयदान

कोल्हापूर: भगवान महावीर अध्यासनाच्या नुतन इमारत बांधकामासाठी दिगंबर जैन बोर्डिंगचे श्री. सुरेश रोटे यांनी रू.१,00,000/- लाखाची देणगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिली.
तसेच कोल्हापूरातील आनंद यात्री ग्रुपचे आप्पासाहेब इनामदार यांनी देखील अक्षयदान भगवान महावीर अध्यासनास दिले. सदर बृहत देणगी बद्दल मा. कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के, डॉ. पी. एस. पाटील तसेच मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
🤙 9921334545