रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या पुढाकारातून ‘लाईफ ट्रान्सफॉर्मशन’चे आयोजन

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून ‘लाईफ ट्रान्सफॉर्मशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वाक्षरीतज्ञ नेहा जैन यांनी मार्गदर्शन केले.
स्वाक्षरीचे महत्व काय आहे, स्वाक्षरीतील बदलातून आयुष्यात कोणते बदल घडवनं शक्य होतं हे क्लबच्या सदस्यांना जाणून घेता यावं या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अरुंधती महाडिक यांनी यावेळी सांगितले.

                     

स्वाक्षरी ही माणसाची फक्त ओळख नव्हे तर त्यातून त्या व्यक्तीच्या स्वभाव गुणाचं दर्शन घडतं. स्वाक्षरीवरून व्यक्तीच्या आयुष्यातील घटना विषयी जाणून घेता येतं त्यामध्ये बदल करता येतात त्यामागे विज्ञान आहे. स्वाक्षरीतील प्रत्यक्ष शब्द त्यांचे चढ-उतार अक्षरांची वळण सही खालील रेषा त्याखाली किती टिंब असावीत यासह विविध पद्धतीने त्यांनी स्वाक्षरी विषयी माहिती दिली. तसेच स्वाक्षरीचे विविध अंगाने किती महत्त्व आहे. याबद्दल स्वाक्षरी तज्ञ नेहा जैन यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बी. एस. शिंपूकडे, रमेश खटावकर, अमोल देशपांडे, दीपक मिरजे, भारती नायक, नासिर बोरसरवाला, जगदीश चव्हाण, कमांडट शिंदे, मनीषा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545