शिवाजी विद्यापीठाच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्‍मा’ पुस्तिकेचे २४ ला प्रकाशन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्‍यासनाच्‍या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्‍या जयंतीनिमित्‍त दि. २४ एप्रिल २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठाच्‍या मानव्‍यविद्या सभागृहात दुपारी ४.०० वाजता डॉ. एन. डी. पाटील लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्‍मा’ या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ मा. सरोज (माई) पाटील यांच्‍या हस्‍ते संपन्न होणार आहे. 
या कार्यक्रमासाठी ज्‍येष्‍ठ साहित्यिक मा. राजन गवस, प्राचार्य. डॉ. टी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्‍यासनाचे समन्‍वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.
🤙 9921334545