कोल्हापूर : महापालिकेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटगृह पुर्नबांधणी अनुषंगाने महानगरपालिका मालकीचे केशवराव भोसले नाटगृहालगत असलेले 11 गाळेधारकांचे गाळे आज महापालिकेने ताब्यात घेतले. याबाबत येथील 14 गाळेधारकांना दि.11 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 81 (ब) 1 अन्वये अंतिम नोटीसा लागू करण्यात आल्या होत्या. या नोटीसांची मुदत संपलेने महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने गाळा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी मध्ये सार्वजनिक उपयुक्तता सेवेसाठी महानगरपालिकेस आवश्यकता असल्यामुळे येथील गाळेधारकांना यापूर्वी नियमात असलेल्या तरतुदीस अनुसरून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. यामध्ये 11 गाळेधारकांनी स्वत:हून आपले गाळे रिकामे करुन महानगरपालिकच्या ताब्येत दिलेले आहेत. तर उर्वरीत 3 गाळेधारकांशी न्यायालयीन लढा सुरु आहे.
सदरची कार्यवाही प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अति.आयुक्त राहूल रोकडे व सहा.आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, शेखर साळोखे, अरुण भोसले, मनिष अतिग्रे, गिरीश नलवडे- जामदार, जर्नादन भालकर, गौतम भोसले, संजय निगडे, सदानंद फाळके, आकाश शिंदे, गणेश सकट, सिकंदर सोनुले, सुशांत कवाळे, कल्पना शिरडवाडे, विभागीय कार्यालय क्रं.02, अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी व जुना राजवाडा पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक, पोलिस महिला व पुरुष कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.