कोल्हापूर : पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे श्री उदय समुह आयोजित “उदय गुणगौरव सोहळा २०२५” पोर्ले तर्फ ठाणे व परिसरातील गावातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच प्रसिद्ध समाज प्रबोधनकार श्री.वसंत हंकारे सर यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील (भाऊ),कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशराम खुडे,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत,पोर्ले तर्फ ठाणे गावच्या सरपंच रजनी चंद्रकांत गुरव,रामचंद्र ज्ञानदेव खुडे,नायकु शंकर खवरे,माजी उपसरपंच शहाजी परशराम खुडे,उदय युवा मंच अध्यक्ष बाबा गवळी यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…