कोल्हापूर : केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाकडून केंद्रीय मार्ग निधीतून कोल्हापूर आयटीआय, पाचगाव, गिरगाव,दऱ्याचे वडगाव,नंदगाव, खेबवडे ते बाचणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३०च्या रुंदीकरण,विस्तारीकरणासह डांबरीकरण आरसीसी गटर्स आणि मोऱ्या तसेच पूल बांधण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीची मागणी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली होती. हा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले.
या कामी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचेही आभार मानले.