कोल्हापूर: अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ नवी दिल्ली मार्फत आयोजित महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ मुल्लाना, जिल्हा अंबाला, हरियाणा येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा 16 जणांचा संघ सहभागी झाला होता.

या संघाने राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा या दोन विषयावर दोन कव्वाली सादर केल्या. या संघास मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्हि. एन. शिंदे, व मा. प्र-संचालक, विद्यार्थी विकास विभाग डॉ. तानाजी चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच मुख्य मार्गदर्शक दीपक बिडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव चे डॉ. राजाराम अतिग्रे यांनी काम पाहिले. या संघास विद्यार्थी विकास विभागाच्या सहाय्यक अधीक्षक सुरेखा आडके व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले