कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या ‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘द हिंदू’ वृत्तपत्र समूहाचे सिनिअर डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांच्या हस्ते शनिवार, दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मास कम्युनिकेशन विभागात होणार आहे.

यावेळी डॉ. राधेश्याम जाधव हे ‘शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के आहेत. शाहूपूर्व आणि राजर्षी शाहू यांच्या काळात कोल्हापुरात कोणती वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत होती आणि या वर्तमानपत्रांनी त्या काळात कोणते विषय हाताळले होते, या दुर्लक्षित विषयावर डॉ. जाधव यांनी संदर्भासह पुस्तकात तपशीलवार मांडणी केली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.