मुंबई : केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज आणि संविधानातील योगदानासाठी 14 एप्रिल रोजी जयंती सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा करताना त्यांनी म्हटले आहे की, “समाजात समानतेचे नवे युग स्थापित करणारे संविधानाचे शिल्पकार, आपले बाबा साहेब पूज्य डॉ. भीमराव आंबेडकर जी यांच्या जयंतीनिमित्त आता सार्वजनिक सुट्टी असेल.”