पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचं काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावा : अजितदादा पवार

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक पार पडली. इचलकरंजी महानगरपालिकेनं भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवाव्यात, नागरिकांचं हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीनं कामं करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

 

 

 

वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचं वितरण होणं आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरंजीसह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचं वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचं काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावा. शक्य असल्यास घाटाचं बांधकाम आरसीसीमध्ये करावं, जेणेकरुन नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत. इचलकरंजी प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीनं प्रवेशद्वाराचं डिझाईन बनवण्यात यावं. तसंच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतींचा बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करावा, अशा सूचना केल्या.

नागरिकांसाठी पिण्याचं पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीनं राबवाव्यात. आरोग्य, शिक्षण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेनं लक्ष द्यावं, असे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

🤙 9921334545