कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, पन्हाळा, मुरगूड, मलकापूर, गडहिंग्लज, वडगांव, हुपरी आणि शिरोळ या 10 नगरपालिकांना फायर प्रॉक्सिमिटी सूटचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात अग्निशमन दलाचे जवानांना आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा तसेच त्यांच्या क्षमता वर्धनासाठी, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रॉक्सिमिटी सूट देण्यात आले आहेत.
आग लागलेल्या भागात प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने फायर प्रॉक्सिमिटी सूट निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकी 6 सूट याप्रमाणे जिल्ह्यातील 10 नगरपालिका सुमारे 60 सूट देण्यात आले. हा सूट परिधान करुन फायरमन आग लागलेल्या भागात जाऊन 60 अंश सेल्सिअस तापमान असेल तरीही काम करू शकतो. यामध्ये हेलमेट, ग्लोव्हज, शर्ट, पॅट आणि गम बूट इत्यादींचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानरगपालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नागेंद्र मुदगेकर, सहा.आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.