कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच स्मिता चौगुले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला असून, तो राजीनामा ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे. परिणामी नूतन सरपंच पदी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयश्री महापुरे यांची वर्णी लागणार असून जयश्री महापुरे या महाविकास आघाडीच्या सदस्य आहेत.
परिणामी गटांतर्गत ठरल्याप्रमाणे जयश्री महापुरे यांचा सरपंच पदासाठी वर्णी लागणार असून येत्या काही दिवसातच नूतन सरपंच निवड होण्याची शक्यता आहे. परिणामी मावळत्या सरपंच सौ स्मिता चौगुले यांचा कार्यकाल उल्लेखनीय ठरला असून त्यांच्या कार्यकाळात कुंभोज सह परिसरात अनेक विकास कामांनी चांगल्या पद्धतीने गती घेतली. विद्यमान सरपंच स्मिता चौगुले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.