कोल्हापूर – आजपासून दुधाच्या दरात 2 रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे गायीचं दूध आता प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रूपयांना ग्राहकांना मिळणार आहे. काल पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात असून पुण्यासह मुंबईत पिशवीतलं दूधही महागणार आहे.
दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असला तरी, हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे असे ग्राहकांचे मत आहे. आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा, असे ही ग्राहकांचं म्हणणं आहे. विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे, इतर गोष्टींची ही महागाई झालेली आहे. ग्राहकांना नवे दर समजावून सांगावे लागतील असे मत आहे. 2 रुपयांप्रमाणे दुधाच्या दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारु करुन दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव दर हे आजपासून लागू करण्यात येणार आहेत, असं दूध उत्पादक व कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.