पंतप्रधान सूर्यघर योजना: 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण; महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

 

 

या एकूण इंस्टॉलेशन्सपैकी महाराष्ट्राने 1,92,936 इंस्टॉलेशन्स पूर्ण करून देशात दुसरे स्थान मिळवले आहे. 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळातही महाराष्ट्र आपले महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.