कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागाने विद्यार्थिनींसाठी रांगोळी, मेहंदी, केसांची शैली अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले. विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. संध्या अडसुळे प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ.एस.व्ही.काटकर यांनी स्वागत केले. संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता ओझा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. ऊर्मिला पोळ, डॉ. के.जी. खराडे, डॉ. एस.एस. गायकवाड, पी.टी. गोयल उपस्थित होते.
यावेळी झालेल्या रांगोळी (१७ गट), मेहंदी (११ गट), केसांची शैली (५ गट) या स्पर्धांत १२० विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या विविध स्पर्धेतील विजेत्यांची नावे अनुक्रमे अशी: रांगोळी स्पर्धा – अंजली पाटील, ऐश्वर्या शिंदे, अनुराधा कांबळे, पल्लवी लायकर, मयुरी बाबर. मेहंदी स्पर्धा – समृध्दी डांगरे, अंकिता जाधव, अनुराधा कांबळे. केसांची शैली स्पर्धा – सानिया देवळे, सई पाटील, मोनिका पाटील.