कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर कॉलेजचा नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रा. डॉ. बी. डी. व्हनमोरे यांना उत्कृष्ट संशोधक या बहुमोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट संशोधक प्रमाणपत्र, ट्रॉफी व 10,000 रुपयाचा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योजक मा. प्रताप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षापासून डॉ. व्हनमोरे हे संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत.प्रा. व्हनमोरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 31 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांनी एक पेटंट सुद्धा केले आहे. त्यांना संशोधनामध्ये डॉ. विजय फुलारी, कुलगुरू बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, संभाजीनगर, डॉ. संदीप पाटील व डॉ. मानसिंग टाकळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय पाटील साहेब, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता सर, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे सर, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे सर, डीन स्टुडन्ट अफेअर डॉ. आर. ए. पाटील, रिसर्च डीन डॉ. अमरसिंह जाधव, विभाग प्रमुख डॉ. एन. डी. सांगळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.