कोल्हापूर : जैवविविधता टिकव टिकवणे ही काळाची गरज असून त्यामुळेच मनुष्य जंगल आणि प्राणी यांच्यामध्ये समतोल राहणार आहे असे उद्गगार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी काढले. केएमसी कॉलेजमध्ये पश्चिम घाटातील जैवविविधता व त्याचे संवर्धन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाबासाहेब उलपे होते. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व अभ्यासक सुहास वायंगणकर यांनी बोलताना पश्चिम घाटातील जैवविविधता कशा पद्धतीने धोक्यामध्ये आलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग करून घेऊन ही जैवविविधता टिकवता येते. यामध्ये कशी वाढ करता येते याबाबत मार्गदर्शन त्यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांनी विद्यार्थी पालक शिक्षक व कर्मचारी यांनी पर्यावरणाचा ध्यास घेऊन पर्यावरण व त्यातील विविधता वाचवण्यासाठी संकल्पपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख ग्रंथपाल प्रा.रवींद्र मांगले यांनी केली. तसेच सूत्रसंचालन डॉ.युवराज मोठे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संजय कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यातील प्रा.पी.डी. तोरस्कर, प्रा.अनिल मुडे, प्रा.एस.एम.शेख, डॉ.प्रशांत नागावकर, डॉ.बी.पाटील, प्रा.सचिन धुर्वे, डॉ.जे. एम.शिवणकर, प्रा.किरण भोसले, विनायक मेस्त्री, जितेंद्र हराळे, डॉ.सोहेल मुजावर, प्रा.संतोष पाटील, डॉ.नामदेव लवटे, प्रा.संतोष झित्रे, प्रा.सूर्यकांत आवटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.