आ. डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते श्री दत्त सहकारी दूध संस्थेच्या सभासदांचा सत्कार

कोल्हापूर – कोरेगांव (ता.वाळवा) येथील श्री दत्त सहकारी दूध संस्थेचा प्रतिदिन 1100 लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल संस्थेच्यावतीने सभासदांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संस्थेतील सर्व संचालक व सभासदांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी कोरेगांवचे माजी सरपंच व वारणा दूध संघाचे माजी संचालक व्यंकटराव केशवराव पाटील (आबा),वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा),वारणा साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील,संदिप जाधव,वारणा दूध संघाचे संचालक लालासो पाटील,व्ही.टी पाटील,अभिजीत पाटील,वारणा बॅकेचे संचालक बाळासो बावडे,वारणा दूध संघाचे माजी संचालक संपतराव पाटील,कोरेगांवचे सरपंच व वारणा दूध संघाचे संचालक मयूर पाटील (दादा),संस्थेचे चेअरमन सुरेश नामदेव पवार,व्हा.चेअरमन सुरेश भगवान पाटील,सचिव रमेश शामराव मोहिते यांच्यासह सर्व संचालक,सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545