लोकांची सेवा केल्याशिवाय मोठे होता येत नाही :मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी हसन मुश्रीफ यांची सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.

 

 

 

लोकांची सेवा केल्याशिवाय मोठे होता येत नाही. याचे भान पदाधिकाऱ्यांनी ठेवून झोकुन देऊन काम करा. यावेळी एक लाख सभासद नोंदणीचा संकल्पही केला. प्रत्येक गावागावात स्टॉलच्या माध्यमातून सभासद नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, महिला शहराध्यक्ष रेखा आवळे, महिला जिल्हाध्यक्ष शितलताई फराकटे, गोकुळचे संचालक युवराज पाटील (बापु), किसनराव चौगुले, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, आजरा कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, संतोष पाटील, शशिकांत खोत, संतोष धुमाळ, संभाजीराव पवार, जयसिंग चव्हाण, महाबळेश्वर चौगुले, सुनील कांबळे, शिरीष देसाई, पंडितराव केणे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545