कोल्हापूर : खुपीरे (ता. करवीर) येथील श्री बलभीम सहकार समुहाच्यावतीने आमदार चंद्रदीप नरके केसरी व स्व. बळवंत पाटील केसरी 2025 भव्य कुस्ती, संजयदादा केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. अत्यंत सुंदर नियोजनातून दिमाखदार स्वरूपात ही स्पर्धा पार पडली. सर्वच सहभागी मल्लानी अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. एकूण 63 हुन अधिक कुस्त्या या स्पर्धेत पार पडल्या.
प्रथम क्रमांकाची आमदार चंद्रदीप नरके केसरी कुस्ती स्पर्धा डबल महाराष् ट्रकेसरी पै. शिवराज राक्षे व हरियाणा केसरी पै. सोनू ग्रेवाल यांच्यात झाली. शिवराजने सोनूचा पराभव करत आमदार केसरी प्रथम क्रमांक मिळवला. शिवराजला दीड किलोची चांदीची गदा आणि दोन लाख रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आली. द्वितीय क्रमांकाची स्व. बळवंत पाटील केसरी कुस्ती शाहू आखाड्याचा पै. सुरज मुंडे व मोतीबाग तालमीचा पै. पवन मोरे यांच्यात झाली. सुरज मुंडेने पवन मोरेला चितपत करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन खुपिरेचे ग्रामपंचायत सदस्य पै. दत्तात्रय पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री किरण गणाचारी यांनी केले होते.
यावेळी माजी खासदार मा. संजयदादा मंडलिक, गोकुळ संचालक अजित नरके, पी. जी. शिंदेसो, संजय पाटील खुपिरेकर यांच्यासह कुंभी समूहाचे सर्व संचालक पदाधिकारी, बलभीम सहकार समूहाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मान्यवर नागरिक आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.