कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर मध्ये शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला. या क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, खो-खो, बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल,व क्रिकेट अशा आठ क्रीडा स्पर्धांचा समावेश असून या स्पर्धेमध्ये तब्बल महाविद्यालयामधील विविध शाखेतून ६५० इतक्या खेळाडूंचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे माजी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. किरण पाटील हे उपस्थित होते आपल्या मनोगत मध्ये त्यांनी अभ्यासाबरोबर खेळाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती म्हणून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, कोल्हापूर च्या मा. वरणा वडगावकर या उपस्थित होत्या आपल्या मनोगत मध्ये त्यांनी खेळामुळे समाजात वावरताना प्रतिनिधित्वाची भावना कशी निर्माण होते हे सांगितले. त्याचबरोबर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या IQAC विभाग समन्वयक डॉ.श्रुती जोशी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार होते. .आपल्या अध्यक्षीय मनोगत मध्ये त्यांनी खेळामध्ये प्राविण्य घेतल्यामुळे शिक्षण व नोकरी मध्ये खेळाचे महत्व पठवून देत महाविद्यालया मध्ये खेळाडूंसाठी शिक्षणात दिल्या जाणाऱ्या सुविधांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.आर.आर. कुंभार व IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. संतोष कुंडले यांनी केले तर आभार विराज खानविलकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, जयेश चव्हाण मुज्जमिल सनदी, प्रतीक मोरे,अभी मनेर, संस्कार सदलगे, ऋग्वेद मंगल,पियुष मोरे,मधुरा पाटील त्याचबरोबर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर.बी.जोग, प्रशासकीय सेवक श्री सुरेश चरापले यांचे विशेष सहकार्य लाभले.